गायक, गीतकार, संगीतकार व पत्रकार अभिजित सहदेव नांदगावकर यांचा आज वाढदिवस

Sep 2, 2024 - 14:50
Sep 2, 2024 - 15:26
 0
गायक, गीतकार, संगीतकार व पत्रकार अभिजित सहदेव नांदगावकर यांचा आज वाढदिवस

रत्नागिरी : अभिजित यांचा जन्म  02 सप्टेंबर, 1979 रोजी आडिवरे नवेदर ता. राजापूर येथे झाला. अभिजित यांचे बालपण गावीच गेले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते रत्नागिरी येथे आले. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच त्यांनी गायन ही आपली कला जोपासण्यास सुरुवात केली. प्रारंभिक शिक्षण विजय रानडेसर व सौ मुग्धा सामंत-भट यांच्याकडे केले. त्यानंतर सुगम संगीताचा अभ्यास मात्र ते स्वतःचा स्वतः करत आहेत. रत्नागिरीमध्ये  गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सांस्कृतिक वार्तांकन करण्याचे काम त्यांनी सुरू केले. ते सुमारे 21 वर्षे याकाळात रत्नागिरीच्या सांस्कृतिक जडणघडणीबाबत सांस्कृतिक पत्रकार म्हणून विशेष ओळख निर्माण केली. आकाशवाणीचा सुगम संगीत मान्यताप्राप्त गायक असलेल्या अभिजित यांनी अनेक स्टेज प्रोग्राममध्ये गाणी गायली आहेत.
  
विशेष उल्लेखनीय म्हणून कौशल इनामदार यांच्या " मराठी अभिमान गीत" मध्ये कोरस गायन; संगीतकार कमलेश भडकमकर, मयुरेश माडगावकर यांचे संयोजनाखाली गायची संधी मिळाली. तसेच प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, प्रसन्नजीत कोसंबी, गायिका अमृता नातू यांच्यासोबत गायनाची संधीही अभिजीत यांना मिळाली आहे. सह्याद्री वाहिनीवरील "ताक धिना धिन- राग एक रंग अनेक " या कार्यक्रमातदेखील त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. झी सा रे ग म प या कार्यक्रमासाठी कोल्हापूर केंद्रातून मुंबई येथील अंतिम फेरीसाठी 750 स्पर्धकांमधून निवड झाली. त्यांच्या अंगभूतची कला जोपासत अभिजित गेली आठ वर्षे  श्री गणेश मूर्ती घडवत आहेत. पुण्यात अभिजित नांदगावकर यांनी सुगम संगीत गायन तंत्र या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. सध्या ते पुणे येथे  वास्तव्याला आहेत.  

अभिजित यांच्या सांगीतिक कारकिर्दीविषयी  - 

अभिजित यांच्या सांगीतिक कारकिर्दीविषयी  - 
आकाशवाणी सुगम संगीत मान्यताप्राप्त गायक.
मराठी संगीत क्षेत्रातील नामांकित सागरिका म्युझिक कंपनीवर "केव्हा केव्हा वाटते..." हे त्यांचे गीत गतवर्षी रिलीज झालेय.
[ || Sagarika Music || ]
New Love Song - केव्हा केव्हा वाटते ,गायक, संगीतकार, गीतकार- अभिजीत नांदगावकर
Song - "Kevha Kevha Vatate " Official Music Video 
यंदा गणेशोत्सवातही "बाप्पा माझा लाडोबा" हे लहानमुलांसाठीचे त्यांचे सुंदर गीत रिलीज झालेय.  बालदोस्तांत व्हायरल होतेय हे गणपती बाप्पाचे धम्माल गीत.....
गीत :- बाप्पा माझा लाडोबा", गीतकार, संगीतकार - अभिजित नांदगावकर, गायक - कु. शौर्य घाडगे
सन 2021 साली अभिजित नांदगावकर यांनी लिहिलेली व संगीतबद्ध केलेली 3 गाणी 
साम मराठी, आयबीएन लोकमत,सह्याद्री वाहिनी
या वाहिन्यांवर नवरात्रोत्सवात 9 दिवस प्रसारित होत होती. ज्यांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 02/Sep/2024

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow