रत्नागिरीतील मिऱ्या एमआयडीसीला ग्रामस्थांचा ठाम विरोधच

Sep 3, 2024 - 11:14
Sep 4, 2024 - 12:13
 0
रत्नागिरीतील मिऱ्या एमआयडीसीला ग्रामस्थांचा ठाम विरोधच

रत्नागिरी : नवलाई पावनाई देवा, जाकादेवी, आमच्या मिऱ्यावर कोणी वक्रदृष्टी टाकली आहे, त्यांना त्यांची जागा दाखवून दे रे देवा... असे गाऱ्हाणे घालत शहराजवळील सडामिऱ्या -जाकीमिऱ्या गावात होणाऱ्या पोर्ट औद्योगिक क्षेत्राला मिऱ्या पंचक्रोशीने एकमुखी विरोध केला, मिऱ्यावासीयांनी यानिमित्ताने एकजूट दाखवली. आलावा येथील पारावर सुमारे तीनशे लोक उपस्थित होते. या प्रकल्पाबाचत पारदर्शकता नाही, म्हणून विरोध असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नुकताच अधिसूचना जारी करून पोर्ट औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यात आले. 

सुमारे ५०० एकरचा भाग एमआयडीसीने पर्यटन औद्योगिक क्षेत्र घोषित केले आहे. सडमिऱ्या -जाकीमिऱ्या येथील खासगी जागा त्ससाठी संपादित करण्यात येणार आहे. तशा नोटीसा देखील गावकऱ्यांना बजावण्यात आल्या. पर्यटनावर आधारित एखादा उद्योग किंवा फूड प्रोसेसिंगवर आधारित उद्योग तेथे येणार असल्याचे सांगण्यात आले.

परंतु याबाबत स्थानिकांना विश्वासात न घेतला हा कार्यवाही करण्यात आल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे सडामिऱ्या -जाकीमिऱ्या यापूर्वी दोन्ही ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा झाल्या त्यामध्ये एकमताने या प्रकल्पाला विरोध झाला. त्यानंतर संपूर्ण मिऱ्या पंचक्रोशीची काल एकत्रित बैठक लावण्यात आली आलावा येथील घरावर ही बैठक झाली. माजी आमदार बाळ माने, कौस्तुभ सावंत आदीनी त्याचे नेतृत्व केले. मोठ्या संख्येने मिऱ्यावासीयांनी एकजुट दाखवली. आम्हाला विश्वासात न घेता ही सर्व प्रक्रिया आहे. त्यामुळे आमचा या प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगत एकमुखी निर्णय घेण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 03/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow