मेघा धाडेची मालिकेत एन्ट्री, साकारणार खलनायिकेची भूमिका
सध्या बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची सर्वत्र चर्चा आहे. बिग बॉस मराठीचा पहिला सीझनही प्रचंड गाजला होता. अभिनेत्री मेघा धाडे या पर्वाची विजेती ठरली होती. मेघा बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीझोतात आली होती.
या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली. आता मेघा नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बिग बॉस मराठी गाजवलेल्या मेघाची झी मराठीच्या मालिकेत वर्णी लागली आहे.
झी मराठीवर 'सावळ्याची जणू सावली' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत मेघा धाडे दिसणार आहे. मेघा या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'सावळ्याची जणू सावली' मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये एक मुलगी स्टेजवर गाताना दिसत आहे. पण, सूर मात्र मालिकेच्या नायिकेचे आहेत. ते गाणं ऐकून मालिकेचा नायक आवाजाच्या प्रेमात पडल्याचं दिसत आहे. नायकाने स्तुती केल्यानंतर नायिका त्याला थँक्यू म्हणणार तितक्याच प्रोमोमध्ये मेघाची एन्ट्री होत असल्याचं दिसत आहे.
What's Your Reaction?