खेडमध्ये १० हजार ९५६ घरगुती गणेशमूर्ती प्रतिष्ठापना; १७ सार्वजनिक उत्सव

Sep 5, 2024 - 16:02
 0
खेडमध्ये १० हजार ९५६ घरगुती गणेशमूर्ती प्रतिष्ठापना; १७ सार्वजनिक उत्सव

खेड : गणेशोत्सवाला ७ सष्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर लाडक्या गणेशाचे स्वागत करण्यासाठी घराची रंगरंगोटी करणे, साफसफाई करणे, आरास तयार करणे आदी जय्यत तयारी सुरू झाली आहे. खेड शहरासह तालुक्यात १७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि १० हजार ९५६ घरगुती गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

शहरात व अन्य भागांत शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेड, महाराष्ट्र, नवनिर्माण सेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेड, मुरली मनोहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेड, खेड बसस्थानक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेड, महात्मा फुले नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेड, संकल्प मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भरणे, गणेश मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भरणे, कुंभारवाडा मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेड, टायटॅनिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेड शिवतर रोड, लोटे परशुराम औद्योगिक वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यालय लोटे, लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अग्निशामक दल लोटे, घाणेसुंट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बेलदार समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वेरळ, बेलदार समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आठवडा बाजार भरणे, गणेश मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दस्तुरी शिवनेरीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भरणे, झोलाई मित्रमंडळ, आंबवली आदी ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहेत.

लाडक्या गणेशाच्या आगमनामुळे शहरासह तालुक्यात आनंदाचे, मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात लागणारे साहित्य, गोड पदार्थ, फळ, मकर आरास करण्यासाठी लागणारे सजावटीचे साहित्य खरेदीसाठी दुकानेही सजली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:18 PM 05/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow