'सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावे', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठं वक्तव्य

Sep 6, 2024 - 14:17
 0
'सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावे', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठं वक्तव्य

नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याबाबत एक महत्वाचे विधान केले आहे. "भारत एक शांतताप्रिय देश आहे, पण शांतता राखण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांनी नेहमी युद्धासाठी सज्ज असणे आवश्यक आहे," असे विधान राजनाथ सिंह यांनी केले.

लखनौ येथील पहिल्या जॉइंट कमांडर्स कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी सशस्त्र दलांचे राष्ट्रीय हित जपण्यासाठी आणि 'आत्मनिर्भर भारत' संकल्पनेत अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमांडर्सच्या संयुक्त परिषदेत राजनाथ सिंह म्हणाले की, जगभरात अस्थिरता असूनही भारत शांत आहे, परंतु आपण सावध राहण्याची गरज आहे. यादरम्यान संरक्षण मंत्र्यांनी तिन्ही सैन्यांमधील एकात्मता वाढवण्याच्या प्रयत्नांचेही कौतुक केले. तसेच, सशस्त्र दलातील बदलांच्या अनुषंगाने संयुक्त लष्करी दृष्टीकोन विकसित करण्याच्या आणि भविष्यातील युद्धांमध्ये देशासमोरील आव्हानांसाठी तयारी करण्यावरही त्यांनी भर दिला.

अनपेक्षित हल्ल्यांना तोंड देण्यासाठी तयार राहा
रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास संघर्ष आणि बांग्लादेशातील सध्याच्या अस्थिर परिस्थितीचा संदर्भ देत संरक्षणमंत्र्यांनी कमांडर्सना या घटनांचे विश्लेषण करण्यास सांगितले आहे. तसेच भविष्यात देशाला भेडसावणाऱ्या समस्या आणि अनपेक्षित हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती आणि या भागातील शांतता आणि स्थैर्याला आव्हान देणाऱ्या शेजारील देशांमध्ये घडणाऱ्या घटनांचा विचार करून सर्वोच्च लष्करी नेतृत्वाने सखोल विश्लेषण करण्याची गरज संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली.

सशस्त्र दलांना अधिक चांगली शस्त्रे द्या
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, आपण आपल्या वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सध्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी आपल्याकडे मजबूत उपकरणे असणे आवश्यक आहे. आपल्याकडे सर्व प्रकारची व्यवस्था असावी. यादरम्यान संरक्षणमंत्र्यांनी कमांडर्सना सशस्त्र दलांच्या शस्त्रागारात पारंपारिक आणि आधुनिक युद्धसामग्रीचा समावेश करण्यास सांगितले. यादरम्यान त्यांनी लष्करी नेतृत्वाला डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अधिक चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:38 06-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow