4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार : राहुल गांधी

May 28, 2024 - 15:22
 0
4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार : राहुल गांधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या अन् शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते जोमाने प्रचार करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारच्या अराह येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर काय केले जाईल, याबाबत माहिती दिली.

गरीब महिलांच्या खात्यावर 85000 रुपये टाकणार
ते म्हणाले की, "इंडिया आघाडीसमोर दोन समस्या आहेत. एक म्हणजे गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी आणि दुसरी म्हणजे बेरोजगारी. काँग्रेस या दोन्ही समस्या एकाच वेळी सोडवणार आहे. 4 जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार येईल आणि त्यानंतर देशातील गरीबांची यादी तयार केली जाईल. प्रत्येक गरीब कुटुंबातून एका महिलेचे नाव निवडले जाईल अन् अशा देशातील करोडो गरीब महिलांच्या बँक खात्यात दरमहा 8500 रुपये टाकतेल जातील. याची सुरुवात येत्या 5 जुलैपासून केली जाईल."

इंडिया आघाडी सत्तेवर येताच...
या सभेपूर्वी त्यांनी भोजपूर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, "आता नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होणार नाहीत, हे निश्चित आहे. ही निवडणूक संविधान वाचवण्याची निवडणूक आहे. भाजप जिंकला तर संविधान बदलून टाकेल. मी जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा नरेंद्र मोदी म्हणाले- भारतात फक्त दोनच जाती आहेत. श्रीमंत आणि गरीब. देशात फक्त 2 जाती आहेत तर नरेंद्र मोदी ओबीसी कसे झाले? म्हणून आम्ही ठरवलंय...इंडिया आघाडी सत्तेवर येताच आम्ही देशात जात जनगणना करू. नरेंद्र मोदींची अग्निवीर योजना देशाच्या लष्कर आणि तरुणांच्या देशभक्तीचा अपमान आहे. आमचे सरकार स्थापन होताच आम्ही सर्वप्रथम अग्निवीर योजना रद्द करू."

प्रियंका गांधींचा घणाघात
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीदेखील भाजपवर जोरदार टीका केली. "भाजप आपल्या पैशाच्या जोरावर राज्यातील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाही वाचवण्याची जबाबदारी पंतप्रधानांची आहे, पण सरकार चोरण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवणारे तेच आहेत. काँग्रेसने नेहमीच देशाची सेवा केली, आमच्यासाठी जनता सर्वोपरि आहे. आम्ही, आमचे सरकार, आमचे नेते आणि आमची विचारधारा ओळखा. आपल्या मताचा वापर लोकशाही आणि संविधानासाठी केला पाहिजे," असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow