चिपळूण : आजारपणाला कंटाळून सावर्डे येथे वृद्धेची विहिरीत उडी घेत आत्महत्या

Sep 2, 2024 - 10:32
 0
चिपळूण : आजारपणाला कंटाळून सावर्डे येथे वृद्धेची विहिरीत उडी घेत आत्महत्या

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथील वृद्धेने आजारपणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. वासंती आत्माराम चव्हाण (७२, रा. सावर्डे-कासारवाडी) असे मृत वृद्धेचे नाव आहे. ही घटना ३० ऑगस्ट रोजी उघडकीस आली. 

याबाबत सावर्डे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासंती चव्हाण ही वृद्ध महिला गेल्या काही वर्षांपासून दम्याच्या आजाराने त्रस्त होती. आपण या आजाराला कंटाळलो आहोत, अशी ती वारंवार सांगत होती. गेले दोन दिवस ती बेपत्ता होती. त्यामुळे तिचा परिसरात शोध घेतला असता सावर्डे कासारवाडी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीत तिचा मृतदेह तरंगताना आढळला. यानंतर सावर्डे पोलिसांना या घटनेची खबर देण्यात आली. या वृद्धेने आजाराला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचल्याचा अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 02-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow