चिपळूण : न्यूक्लियर मेडिकल सेंटरमुळे जीवनमान उंचावेल : डॉ. सुदीप गुप्ता

Jul 16, 2024 - 13:42
 0
चिपळूण : न्यूक्लियर मेडिकल सेंटरमुळे जीवनमान उंचावेल : डॉ. सुदीप गुप्ता

चिपळूण : कर्करोगाच्या प्रत्येक रुग्णांच्या घरानजीक उपचार केंद्र उपलब्ध करणे हे आमचे मुख्य उद्दीष्ट आणि ध्येय आहे. हेच ध्येय डेरवणमध्ये साकार करताना डॉ. श्रीपाद बाणावली हे वालावलकर व टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांना जोडणाऱ्या नाळेची भूमिका बजावत आहेत. यापुढे वालावलकर हॉस्पिटल व टाटा हॉस्पिटल हे नेहमी एकजुटीने हातात हात घालून पुढील वाटचाल करतील. सेंटर फॉर न्यूक्लियर मेडिसिन सुविधेमुळे ग्रामीण व्यक्तींचे जीवनमान लक्षणीयरीत्या सुधारेल, असे प्रतिपादन टाटा हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी येथे केले.

चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात टाटा मेमोरिअल सेंटर, कोटक महिंद्रा बैंक लिमिटेड आणि रमा पुरुषोत्तम फौंडेशन यांनी 'सेंटअर फॉर न्यूक्लियर मेडिसिन' कार्यान्वित केले आहे. त्याचा शुभारंभ रविवारी १४ जुलै रोजी टाटा मेमोरियलचे अधिष्ठाता डॉ. सुदीप गुप्ता यांच्या हस्ते फित कापून झाले. या सेंटर फॉर न्यूक्लियर मेडिसिनची स्थापना स्वतंत्र इमारतीत केली आहे. या इमारतीच्या उ‌द्घाटन सोहळ्याला प्रमुख विश्वस्त अशोक जोशी, विकास वालावलकर, रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील, टाटा मेमोरियलचे डॉ श्रीपाद वाणावली, माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, कोटक महिंद्रा बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुदीप गुप्ता म्हणाले की, अशोक जोशी (काका महाराज), विकास वालावलकर, डॉ. श्रीपाद बाणावली या मंडळींचे आभार मानावे लागेल. खरंतर कोकणात १९९६ पासून म्हणजेच गेली २८ वर्षे टाटा मेमोरियल कार्यरत आहे. नवीन नुक्लिअर मेडिसिन केंद्रात पेट सिटी आणि स्पेक्ट स्कॅन सुविधा, रेडिओ आयोडीन थेरपी, या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. विभागात निर्माण होणारा किरणोत्सर्गी कचरा साठवण्यासाठी समर्पित किरणोत्सर्गी कचरा साठवण कक्ष तयार केले जातात. सुरक्षितता राखण्यासाठी स्वतंत्र किरणोत्सर्गी स्रोत स्टोरेज रूम सुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत. यानंतर टाटा संचालक डॉ. श्रीपाद बाणवली यांनी कोकणातील रुग्णांना पेट सिटी स्कॅन कार्डियाक व्हायबिलिटी, रीनल, कार्डियाक, लिव्हर, बोन, थायरॉईड, जी आय रिफ्लक्स, फुफ्फुसाचे परफ्युजन स्कॅन, आयोडीन थेरपी या सुविधेचा लाभ होणार असल्याचे सांगितले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow