विलास रहाटेंनी तांदळातून साकारली गणेश प्रतिमा

Sep 12, 2024 - 10:28
Sep 12, 2024 - 10:33
 0
विलास रहाटेंनी तांदळातून साकारली गणेश प्रतिमा

साखरपा : देवरूख येथील चित्रकार आणि रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी त्यांच्या घरी तांदळांचा वापर करत गणपतीची प्रतिमा साकारली आहे. कोणत्याही शुभकार्यात अक्षता हा अविभाज्य भाग असतो. गणेशोत्सवातही गणपतीवर अक्षता वाहिल्या जातात. त्यामुळे अक्षता ज्या तांदळापासून करतात त्या तांदळाचा वापर करून गणेश प्रतिमा साकारण्याची कल्पना विलास रहाटे यांना सुचली. त्यानुसार त्यांनी रंगीत तांदळांचा वापर करून ही प्रतिमा साकारली आहे.

रांगोळेचे रंग वापरुन त्यांनी तांदूळ रंगीत केले आणि त्यांचा वापर करत ही प्रतिमा साकारली. दोन फुट बाय अडीच फुट एवढ्या आकारात ही प्रतिमा त्यांनी साकारली आहे. देवरुख गावात ही प्रतिमा सध्या आकर्षणाचा विषय ठरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 9/12/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow