रामदास कदमांकडून रामगिरींच्या वक्तव्याचा निषेध, म्हणाले..

Sep 14, 2024 - 14:20
 0
रामदास कदमांकडून रामगिरींच्या वक्तव्याचा निषेध, म्हणाले..

खेड : नाशिकमध्ये मोहम्मद पैगंबर यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रामगिरी महाराज चांगलेच चर्चेत आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही असं म्हणत रामगिरी महाराजांचे पाठराखण केल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी महायुतीला घरचा आहेर दिल्याचं दिसतंय.

मधल्या काळात महंमद पैगंबर यांच्याबद्दल करण्यात आलेलं वक्तव्य निषेधार्ह हे असल्याचं सांगत हिंदू धर्मगुरूंनी मुस्लिम धर्मावर बोलू नये, आणि मुस्लिम धर्मगुरूंनी हिंदू धर्मावर बोलू नये असा सल्ला रामदास कदम यांनी दिलाय. खेडमध्ये ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन केल्यानंतर त्यांच्याच पक्षातील रामदास कदम यांच्या या नव्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

काय म्हणाले रामदास कदम?

शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले,मधल्या काळात मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल करण्यात आलेला वक्तव्य निषेधार्य आहे. कुणालाही कुणाच्या धम्माबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. हिंदूंच्या धर्मगुरूंनी मुस्लिम धर्मावर बोलू नये आणि मुस्लिम धर्मगुरूंनी हिंदू धर्मावर बोलू नये. कोणाच्याही धर्माबद्दल बोलणं चुकीचं. देशात लोकशाही आहे. सर्वधर्मसमभाव आहे. अशी वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावले आहेत. यावर मी तीव्र निषेध करतो. खेडमधील अलसफा वेल्फेअर फाउंडेशन कडून आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते.

शिंदे सेनेतल्याच रामदास कदम यांचा महायुतीला घरचा आहेर

महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावांमध्ये प्रवचनाच्या दरम्यान मुस्लिम समाजा विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर मध्ये तणावही निर्माण झाला होता. यावेळी मोठा जमाव एकत्र आल्याने मोठी खळबळ उडाली होती. यानंतर रामगिरी महाराजांवर अनेक गुन्हे दाखल झाले. त्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामगिरी महाराजांसोबत एकाच व्यासपीठावर दिसले. यानंतर त्यांनी संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही असं म्हणत रामगिरी महाराजांच्या वक्तव्यांचा एक प्रकारे समर्थनच केले होते. आता शिंदे गटातीलच नेते रामदास कदम यांनी महायुतीला घरचा आहेर दाखवल्याचे दिसले. रामगिरींचं वक्तव्य निषेधार्थ असल्याचं सांगत त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतलेच दिसून आलं.

कोण आहेत रामगिरी महाराज?

वैजापूर तालुक्यातील कापूरवाडीचे भूमिपूत्र थोर संत सद्गुरु गंगागिर महाराज यांचा जन्म सन 1814 साली झाला आणि सन 1902 मध्ये त्यांचे महानिर्वाण झाले. त्यांनी वैजापूर (जि.छत्रपती संभाजीनगर) आणि श्रीरामपूर (जि.अहमदनगर) या दोन तालुक्यांच्या सीमांना स्पर्श करणार्या गोदाकाठावरील सराला बेटावर मठाची स्थापना केली. या बेटावरील त्यांचे कार्य पाहून प्रभावित झालेल्या वैजापूरच्या रुपचंद संचेती यांनी या बेटावरील त्यांची 65 एकर सुपिक जमीन त्यांना दान केली. वारकरी संप्रदायाच्या समर्पक विचारधारेतून त्यांनी तत्कालीन निजामशाहीच्या जुलमी राजवटीत पिचलेल्यांना एकत्र केले. शिर्डीचे साईबाबा सद्गुरु गंगागिर महाराजांना गुरुस्थानी मानीत असतं. लोकांना संघटीत करण्यासाठी त्यांनी लोकसहभागातून सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी देवळा-रावळातून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा रुजवली.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:45 14-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow