राजापुरात २९ सप्टेंबर रोजी आरती स्पर्धा

Sep 19, 2024 - 15:25
 0
राजापुरात २९ सप्टेंबर रोजी आरती स्पर्धा

राजापूर : राजापूर तालुका ब्राह्मण सेवा मंडळ, राजापूरतर्फे तालुकास्तरीय आरती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ही स्पर्धा रविवार, दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता कलामंदिर सभागृह राजापूर हायस्कूल येथे होणार आहे. या स्पर्धेला नियम व अटी ठेवण्यात आल्या आहेत. स्पर्धेतील पारंपरिक वाद्ये सहभागी संघांनी आणायची आहेत. संघांना पोशाख आवश्यक आहे. आरत्यांचे सादरीकरण सांघिक असावे, एका संघामध्ये जास्तीत जास्त पंधरा जणांचा समावेश असावा. प्रथम नोंदणी करणाऱ्या १५ संघांनाच स्पर्धेत भाग घेता येईल. प्रथम क्रमांकाला पाच हजार, द्वितीय क्रमांकाला तीन हजार, तृतीय क्रमांकाला दोन हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी प्रवीण करंबेळकर यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राजापूर तालुका ब्राह्मण सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:53 PM 19/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow