खेड : साहिल सोंडकरची थल सैनिक कॅम्पसाठी निवड
खेड : येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या साहिल सोंडकर या विद्यार्थ्यांची दिल्ली येथे होणाऱ्या ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प २०२४ साठी निवड झाली आहे. साहिल हा एस. वाय. आय.टी. मध्ये शिकत आहे. त्याला एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ. एच. पी. थोरात तसेच केअरटेकर डॉ. सचिन सागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेश बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन अॅड. आनंदराव भोसले, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. त्याचे खेड तालुक्यात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:00 PM 19/Sep/2024
What's Your Reaction?