शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा : नामदेव निकम

Sep 20, 2024 - 13:39
Sep 20, 2024 - 13:49
 0
शेतकऱ्यांनी  एकत्र येऊन  उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा  : नामदेव निकम

खेड : पारंपरिक शेती बरोबरच आधुनिक शेतीला देखील महत्त्व देणे आवश्यक आहे. विविध सुधारित अवजारांचा वापर करून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन खेड भूमिपुत्र फार्मर अँड प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष नामदेव निकम यांनी केले आहे. भरणे येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये निकम बोलत होते.

या मेळाव्याला परशुराम लांबे, संचालक प्रकाश जाधव, रवींद्र जाधव, यशवंतराव मोरे, विलास दोरखडे, सतीश कदम, ह.भ.प. येसरे महाराज, विवेकानंद संस्थेचे विवेक शेंडे, स्वप्नील महाडिक, अनिश मर्चडे, कृषी विभागाचे स्वप्नील महाडिक, आत्मा संस्थेचे अनुष्का मोहिते, दापोली येथील शेतकरी संतोष महाजन, पशुसंवर्धन विभागाचे विजय देशमुख, सुखदेव पवार, गायकवाड, सकपाळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कृषी मेळाव्यामध्ये सर्व मान्यवर आणि शेतकऱ्यांना रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. खेड तालुक्यातील खवटी येथील दानशूर शेतकरी आणि कंपनीचे संचालक यशवंतराव मोरे यांनी खेड भूमिपुत्र कंपनीला पंधरा गुंठे जागा बक्षीस रूपाने प्रदान केल्याबद्दल त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सतीश कदम यांनी तर रवींद्र जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 20/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow