रत्नागिरी नगर परिषदेच्या लाभार्थी सफाई कामगारांना खोल्या मिळण्यात अडथळा

Sep 20, 2024 - 13:36
 0
रत्नागिरी नगर परिषदेच्या लाभार्थी सफाई कामगारांना खोल्या मिळण्यात अडथळा

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या सफाई कामगारांना राहण्यास मोफत खोल्या देण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. लाभार्थी कामगारांचा पूर्व इतिहास तपासून खोल्या देण्याबाबतचे निवेदन श्रमिक कामगार संघाच्या नावाने देण्यात आल्याने कामगारांना या खोल्या मिळण्यात विलंब होण्याची शक्यता आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत रत्नागिरी शहरातील साफल्यनगर येथे खोल्या बांधण्यात आल्या आहेत. सफाई कामगारांना राहण्यासाठी या खोल्या मोफत देण्याबाबतचे नियोजन आहे. सुमारे १५ खोल्यांचे वाटप करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती.

श्रमिक कामगार संघाच्या नावावर विनोद वाघेला यांच्या नावाने रत्नागिरी नगर परिषदेला निवेदन देण्यात आले आहे. कामगारांना खोल्या देताना लाभार्थी कामगारांचा इतिहास तपासूनच कार्यवाही करावी, अशी सूचना या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रत्नागिरी नगर परिषदेला वा निवेदनामुळे आता लाभार्थी कामगारांमध्ये कोणावर गुन्हा दाखल आहे का? रत्नागिरी नगर परिषदेच्या कामकाजात कोणावर कारवाई झाली आहे का? याची तपासणी करावी लागणार आहे. त्यानंतरच या खोल्यांचे वाटप होऊ शकणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 20/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow