लांजा : केळंबे येथे राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा

Sep 20, 2024 - 13:46
 0
लांजा : केळंबे येथे राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा

लांजा : लांजा तालुक्यातील श्री विठ्ठलाई स्पोर्टस क्लब, केळंबे आयोजित शनिवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा घाटी व गावठी गटांमध्ये होणार असून, स्पर्धा केळंबे बौद्धवाडी (देवमळा) येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत दोन्ही गटातील विजेत्यांना प्रथम क्रमांक ११००० व आकर्षक ढाल, द्वितीय क्रमांक ७००० व आकर्षक ढाल, तृतीय क्रमांक रु. ५००० व आकर्ष ढाल, चतुर्थ क्रमांक ४०००, पाचवा क्रमांक रु. ३००० सहावा क्रमांकासाठी रुपये २००० व ढाल, यासह सातवा, आठवा, नववा व दहावा क्रमांकासाठी प्रत्येकी १ हजार रुपये व आकर्षक ढाल तर घाटी व गावठी अशा दोन्ही गटातील ११ ते १५ क्रमांक पटकावणाऱ्या बैल जोडीला प्रत्येकी आकर्षक ढाल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सचिन इंगळे, सुधाकर झोरे, प्रितम झोरे, योगेश झोरे, मनोज पवार, प्रकाश गुरव यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री विठ्ठलाई स्पोर्टस् क्लब, केळंबे यांनी केले आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 20/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow