आरोग्य मंदिर येथे ट्रक-एसटीमध्ये चिरडली दुचाकी; दोन मुली बचावल्या

Jun 11, 2024 - 10:55
 0
आरोग्य मंदिर येथे ट्रक-एसटीमध्ये चिरडली दुचाकी; दोन मुली बचावल्या

रत्नागिरी : शहरातील आरोग्य मंदिर बस थांब्यावर संध्याकाळी विचित्र अपघात झाला. दोन गाड्यांमध्ये दुचाकी चिरडली. सुदैवाने यामध्ये दोन मुली बचावल्या असून त्या जखमी आहेत. त्यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी ती सुरळीत केली. सुबधा सुर्वे आणि अश्विनी बोरकर (रा. भंडारपुळे) अशी जखमी मुलींची नावे आहेत.

दोन्ही मुली दुचाकी घेऊन रत्नागिरीत शहरात येत होत्या. यावेळी वरून आलेल्या मिक्सर ट्रकने त्यांना हूल दिल्यामुळे त्या आरोग्य मंदिर बस थांब्याजवळ उभी असलेल्या बस आणि मिक्सर या दोन्ही वाहनांच्यामध्ये चिरडल्या. यामुळे गोंधळ निर्माण झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 11-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow