Anjali Damania: ‘सर्वच राजकीय पक्षांचे नेते भ्रष्ट; सरन्यायाधीशांनीही सामान्य माणसाला झुरळ म्हटले!’ सामान्य माणसाने जागृत व्हावे : अंजली दमानिया

पुणे : ‘देशातील सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. कोणत्याही एका पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही, कारण आज सर्वच राजकीय पक्षांचे नेते भ्रष्ट झाले आहेत, अशा परिस्थितीत आता सर्वसामान्य नागरिकांनीच जागृत होण्याची वेळ आली आहे.

आपल्या हक्कांसाठी आणि देशाच्या भवितव्यासाठी जनतेनेच आता एकत्र येऊन मोठा लढा उभारला पाहिजे,’ असे परखड आवाहन प्रसिद्ध सामाजिक व भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. सहकारनगर येथील मुक्तागंण बालरंजन केद्र येथे ‘सहजीवन व्याख्यामाले’त ‘कैफियत सामान्य माणसाची…’ या विषयावर त्या बोलत होत्या. ‘सहजीवन व्याख्यानमाले’चे २५ वे वर्ष असून अध्यक्ष विनय कुलकर्णी, चिटणीस उदय कुलकर्णींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दमानिया म्हणाल्या की, आपला देश कधी बदलणार? देशाच्या सरन्यायाधीशही सामान्य माणसाला झुरळ म्हणाले. जोपर्यंत सामान्य नागरिक चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवत नाही, तोपर्यंत नेते सुधारणार नाहीत. लोकशाहीत जनता हीच खरी मालक आहे, याची जाणीव नागरिकांनी करून दिली पाहिजे.

राज्यात २९ हजार कोटी खड्डे

देशात विकासाच्या नावाखाली डेव्हलपमेन्ट टॅक्स फंड गोळा केला जातो. ‘जीएसटी’तून ४१ हजार कोटी मिळतात. तर २९ हजार कोटी खड्डे राज्यात आहेत. त्यावरून सामान्य नागरिकांना चालावे लागते. तर राज्यातील २२ हजार शाळा धोक्यात आहेत. तर २५ हजार ते १ लाख पगार घेणाऱ्या नागरिकांना टॅक्स भरावा लागतो. मात्र सुविधांचा अभाव आहे. तरी सरकारच्या विरोधात कोणी बोलायला तयार होत नाही, याची खंत वाटते.

गुजरातमध्ये सर्वांत जास्त टॅक्स चोरी

देशासाठी कर दिला पाहिजे. डिजिटल इंडिया बोलले जाते. मात्र, गुजरातमध्ये सर्वाधिक टॅक्स चोरी होते. गुजरात येथील टेक्स्टाइल उद्योजक व कंपनी कर वाचवण्याच्या फंड्यात टॅक्स चोरी करतात. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अर्थतज्ज्ञ होते. मात्र, आताचे नेते यांना व्यवस्था समजत नाही. भ्रष्टाचाराच्या या विळख्यातून देशाला बाहेर काढायचे असेल, तर केवळ नेत्यांना बदलून चालणार नाही, तर संपूर्ण व्यवस्था बदलण्याची गरज आहे. यापुढे बोलताना दमानिया यांनी राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तीव्र शब्दांत प्रहार केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:34 26-05-2026