रत्नागिरी जिल्ह्यातील वातावरण मिश्र

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाने पूर्णतः उघडीप घेतली आहे. सोमवारची पहाट हलक्या थंडीच्या चाहुलीने झाली. काही भगात धुक्याची झालर होती. मात्र, सकाळी आठ नंतर तापमानात वाढ होऊन वातावरण कोरडे झाले. त्यामुळे पहाट थंडीची तर दिवस उकाड्याचा असे वातावरण सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या शहरासहीत ग्रामीण भागात आहे. सोमवारी रत्नागिरीत पहाटे तापमान २९ अंशावर होते. ते सकाळी आठ वाजता ३० अंशावर गेले. त्यानंतरही तापमानात वाढ नोंदविली. त्यामुळे सध्यातरी रत्नागिरी जिल्ह्यातील वातावरण मिश्र आहे.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला गुलाबी थंडी पडते. मात्र यंदा पावसाळी हंगाम लांबल्याने थंडीची मात्रा नोव्हेंबर महिन्यात कमीच राहणार असून, सरासरी तापमामात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:05 05-11-2024

tata motars