विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे न घेतल्याने दिल्लीत जंतर-मंतरवर भव्य आंदोलनाची तयारी
छत्रपती संभाजीनगर: विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यासह विविध मागण्या अद्याप मान्य न झाल्याने कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी येत्या ५ तारखेला दिल्लीत तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. सरकार कोर्टाचे कारण पुढे करत असले, तरी कोर्ट यावर तयार आहे आणि सरकारकडूनच लिस्ट दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील सर्वच राज्यांत सध्या आंदोलने सुरू असून, दिल्लीत यापूर्वी झालेल्या आंदोलनापेक्षाही मोठे आंदोलन उभारले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बॉम्बे हायकोर्ट क्लार्क टायपिंग चाचणी रद्द; फेरपरीक्षेची मागणी मान्य
परीक्षांमधील गोंधळावर बोलताना अभिजीत दीपके यांनी सांगितले की, की-बोर्डमधील तांत्रिक अडचणींमुळे बॉम्बे हायकोर्टाची क्लार्क टायपिंग टेस्ट रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची फेरपरीक्षेची मागणी मान्य झाली असून, यापुढे ज्या केंद्रांवर गोंधळ आणि तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, अशा परीक्षा केंद्रांवर पुन्हा कधीही परीक्षा आयोजित करू नयेत, अशी मागणी त्यांनी केली.
सोनम वांगचुक यांच्या वक्तव्याचे समर्थन आणि मनोज जरांगे यांची घेणार भेट
सोनम वांगचुक यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना दीपके म्हणाले की, त्यांनी कोणताही अविश्वास दाखवलेला नाही. सध्याच्या राजकारण्यांपेक्षा शिकलेली तरुण मुले खूप चांगली आहेत, असाच संदेश त्यांनी पूर्ण व्हिडिओमध्ये दिला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत ते म्हणाले की, जरांगे हे मराठा समाजातील मुलांसाठी शिक्षण आणि रोजगाराचा हक्क मागत आहेत. सरकार यात अपयशी ठरल्यामुळेच ही वेळ आली असून, आपण मनोज जरांगे यांची लवकरच प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 31-08-2026














