साठरेबांबर येथे महिलेच्या डोक्यात कुलूप मारले

रत्नागिरी : घराच्या दरवाजाचे कुलूप काढत असताना एका मद्यपीने तेच कुलूप डोक्यात घालून महिलेला दुखापत केली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात मद्यपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय उर्फ बंड्या रामंचद्र सावंत असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २९) सकाळी साठरेबांबर येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घराला लावलेले कुलूप काढत असताना गावातील संजय सावंत याने मद्याच्या नशेत दरवाजा लवकर उघडा, असे सांगितले. त्या वेळी फिर्यादी महिलेने तू इथून जा, असे सांगितल्याचा राग मनात धरून मद्यपीने त्यांच्या हातातील कुलूप घेऊन त्यांच्या डोक्यावर मारून शिवीगाळ केली. या प्रकरणी महिलेने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित मद्यपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 02-12-2024

cake of the day