चिपळूण शहर भागात रेल्वे तिकीट काऊंटर सुरू

चिपळूण : चिपळूण शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना कोकण रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या हायवेकडील तिकीट खिडकीकडे जावे लागत होते. यामुळे चिपळूण शहर (गांधारेश्वर) बाजूकडील भागात तिकीट घर व्हावे अशी मागणी होत होती. या बाबत कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे शौकत मुकादम यांनी पाठपुरावा केल्यानंतर या ठिकाणी तिकीट घर सुरू झाले असून याची पाहणी नुकतीच शौकत मुकादम यांनी केली.

चिपळूण रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूमच्या उद्घाटनप्रसंगी को. रे. चे चेअरमन संतोषकुमार झा हे आले असता मुकादम व आ. शेखर निकम यांनी त्यांच्याकडे चिपळूण शहरासाठी नवीन तिकीट बुकींग काऊंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली होती. या मागणीची चेअरमन झा यांनी दखल घेऊन चिपळूण बुकींग काऊंटर सुरू करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय आता दूर होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 05/Dec/2024

Rotery school