खेड : देवसडेतील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

खेड : तालुक्यातील देवसडे-मधलीवाडी येथील वृद्धाचा सोमवारी लोटे येथील साई रुग्णालयामध्ये आकस्मिक मृत्यू झाला. रवींद्र रामचंद्र देवळे (वय ५६) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

ते लोटे पटवर्धन येथील सावंत यांच्याकडे भाड्याने वास्तव्यास होते. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 27-09-2024

Rotery school