चिपळूण : अडरे-ढाकरवाडी पुलाचे भूमिपूजन

चिपळूण : अडरे ढाकरवाडी येथील अतिशय महत्त्वाचा अंतर्गत वाड्यांना व गावाला जोडणारा पूल आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून मंजूर झाला होता. त्याचे भूमिपूजन नुकतेच आमदार निकम यांच्या हस्ते झाले.

गावाचा विकास व गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी आमदार निकम यांनी वेळोवेळी तत्पर दाखवत कामे मंजूर केली. या भूमिपूजनाने अपेक्षांना नवी दिशा मिळाली असून, विकासाच्यादृष्टीने एक मोठे पाऊल आहे, असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

या वेळी माजी सभापती शशीभाऊ चाळके, माजी सभापती सूर्यकांत खेतले, सरपंच दीक्षा कांबळे, सरपंच रोहित गमरे, उपसरपंच संजना कदम, रिचा कदम, रवींद्र कदम, मुंढे सरपंच मयूर खेतले, शाम खेतले, दत्ताराम तांदळे, जिवाजी कांबळे, चंद्रकांत तांदळे, हरी पिंपरे, अशोक गिजये आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:42 28-12-2024

Rotery school