मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार रात्री उशिरा त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या ब्रीच कँडी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.
विख्यात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार
मिळालेल्या माहितीनुसार रतन टाटा यांना यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शाहरुख असपी गोळवाला यांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. डॉ. शाहरुख हे एक विख्यात डॉक्टर आहेत. रतन टाटा यांना रात्री उशिरा 12.30 ते 1 वाजेच्या दरम्यान सुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयात दाखल करण्यामागचं कारण काय?
सूत्रांच्या माहितीनुसार रतन टाटा यांचा रक्तदाब रात्री कमी झाला होता. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. परिणामी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:03 07-10-2024