असुर्डे येथे कार-रिक्षा अपघात प्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा

चिपळूण : भरधाव रिक्षाने कारला धडक दिल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील असुर्डे येथे शनिवारी घडली. याप्रकरणी रविवारी रिक्षा चालकावर सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन संभाजी सावंत (४०, चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद किरण हनुमंत तळेकर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण तळेकर हे त्यांच्या ताब्यातील कार घेऊन शिवडा ते खारेपाटण असे मुंबई-गोवा महामार्गाने घेऊन जात होते. असे असताना सचिन सावंत याच्या ताब्यातील रिक्षाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षाने किरण तळेकर यांच्या कारला समोरून धडक दिली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. यावेळी रिक्षातील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 09-10-2024

JMBR ACADEMY – ADMISSIONS OPEN!