ब्रेकिंग : झिम्बॉब्वे दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियात अचानक बदल; तिघांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी

Jul 2, 2024 - 15:38
 0
ब्रेकिंग : झिम्बॉब्वे दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियात अचानक बदल; तिघांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी

नवी दिल्ली : टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताची यंग ब्रिगेड शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्त्वात झिम्बॉब्वेच्या (Zimbabwe) दौऱ्यावर जाणार आहे. 6 जुलैपासून भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यामध्ये पाच टी20 सामन्यांची मालिका पार पडणार आहे.

झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी निवड झालेल्या संघातील सदस्य संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल हे तिघे बारबाडोसमध्ये अडकून पडल्यानं ते भारतीय संघासोबत जॉईन होईपर्यंत साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा या तिघांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेसाठी शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतीय संघ जाहीर करण्यात आला होता.

टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघासोबत यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि शिवम दुबे बारबाडोसमध्ये आहेत. हे तिघे भारतात बुधवारी सायंकाळी पावणे आठ वाजता भारतात दाखल होतील. त्यानंतर विश्रांती घेतल्यानंतर तीन सामन्यांसाठी ते हरारेला रवाना होतील.

पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडिया

शुभमन गिल (कर्णधार),ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, रिंकु सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), हर्षित राणा, रियान पराग, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या हर्षित राणाला पहिल्यांदा भारतीय संघात स्थान मिळालं आहे. झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी पहिल्यांदा भारतीय संघ जाहीर झाला होता त्यावेळी हर्षित राणाला भारतीय संघात स्थान मिळालं नव्हतं. त्यावेळी उलट सुलट चर्चा झाल्या होत्या. आता हर्षित राणाला भारतीय संघाता स्थान मिळालं आहे. यशस्वी जयस्वाल पर्याय म्हणून गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या साई सुदर्शनला संधी दिली गेलीय. तर, संजू सॅमसनच्या जागी जितेश शर्माला संधी देण्यात आलीय. तर, शिवम दुबेच्या जागी हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे.

भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील पाच सामन्यांची टी 20 मालिका 6 जुलै रोजी सुरु होणार असून ती 14 जुलैपर्यंत चालणार आहे. यावेळी भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी शुभमन गिलकडे देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:42 02-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow