किमोथेरेपी आधी हिना खानची पुरस्कार सोहळ्यात हजेरी

Jul 2, 2024 - 12:47
Jul 2, 2024 - 16:17
 0
किमोथेरेपी आधी हिना खानची पुरस्कार सोहळ्यात हजेरी

छोट्या पडद्यावरील महागड्या अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री हिना खान (Hina Khan)सध्या ब्रेस्ट कॅन्सरसोबत दोन हात करत आहे. हिनाला तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरचे निदान झाले आहे.

आपल्या आजाराची माहिती तिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. आता हिना खानने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत एक पोस्टही लिहिली आहे. हिना खानने किमोथेरेपीसाठी रुग्णालयात दाखल होण्याआधी एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

हिना खानने या व्हिडिओसोबत लिहिले की, 'ही अवॉर्ड नाईट आहे, मला माझ्या कॅन्सरबद्दल माहिती होती पण मी जाणीवपूर्वक त्याला सामान्यपणे वावरण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय माझ्यासाठी नव्हता तर सगळ्यांसाठी होता. पुढे हिनाने म्हटले की, हा तो दिवस होता ज्याने सर्व काही बदलून टाकले, माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक टप्प्याची सुरुवात होती.

किमोथेरेपी आधी पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती

तिने पुढे म्हटले की, माझ्या पहिल्या केमोच्या अगदी आधी मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या एकट्याची प्रेरणा नव्हती, खरं तर मी प्रत्येकाला आवाहन करते की त्यांच्या जीवनातील सर्व अडचणींना एखाद्या सामान्य अडचणींप्रमाणेच सामोरे जा. तुमचे ध्येय ठरवा. ते कितीही कठीण असले तरी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, कधीही हार मानू नका असेही हिना खानने म्हटले.

ये रिश्ता क्या कहलाता या शोमधून प्रसिद्धी

हिना खान ही टेलिव्हिजन शो ये रिश्ता क्या कहलातामध्ये अक्षराची भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. या शोमध्ये तिने सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारून घराघरात आपले नाव निर्माण केले. यानंतर बिग बॉस 11 मध्ये दिसली हिना शोची विजेती ठरली नाही, पण बिग बॉसमुळे तिची लोकप्रियता दुप्पट झाली. टेलिव्हिजन शो व्यतिरिक्त, त्याने वेब शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिना खानने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow