सावर्डेचा वीजपुरवठा आज सायंकाळपर्यंत सुरळीत होणार

May 27, 2024 - 15:49
 0
सावर्डेचा वीजपुरवठा आज सायंकाळपर्यंत सुरळीत होणार

सावर्डे : सोमवार सायंकाळ पर्यंत गावांचा वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांनी दिली. सावर्डे उपविभागातील २५ हजार ग्राहक अंधारात होते. चक्रीवादळ आणि मॉन्सूनपूर्व पावसाने घातलेल्या थैमानामुळे सावर्डे भागात 'महावितरण'च्या वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसला. सावर्डे, निवळी, कोकरे, डेरवण, कुडप, हडकणी, असुर्डे, खेरशेत गावात २२ मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यावेळी महावितरणचे खांब पडल्यामुळे हा परिसर अंधारात होता. सावर्डे उपविभागातील एकूण २५ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा बंद होता. वादळ व पाऊस थांबल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम त्वरित सुरू करण्यात आले. मागील चार दिवस वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

वादळामुळे महावितरणचे ३३ के. व्ही, उच्चदाब वाहिनीचे सात खांब, ११ के. व्ही. उच्चदाब वाहिनीचे २८ खांब व लघुदाब वाहिनीचे ५४ खांब असे एकूण १०० खांब पडले, बऱ्याच ठिकाणी लघुदाब वाहिनी व उच्चदाब वाहिनीच्या तारा तुटल्या. या वादळामुळे महावितरणचे एकूण अंदाजे ३८ लाखांचे नुकसान झाले. हे खांब पडल्यामुळे सावर्डे उपविभागातील एकूण २५ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा बंद होता. वादळ व पाऊस थांबल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम त्वरित सुरू करण्यात आले आहे.

रविवारी सकाळपर्यंत विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ७ अभियंते, ५५ कर्मचारी तसेच ४५ कंत्राटी कर्मचारी झटत होते. उव्यदाब तसेच लघुदाब वहिनीच्या खांबांचे काम चार दिवसांत झाल्यामुळे २५ हजार १५० ग्राहकांचा पुरवठा सुरळीत करण्यात आला. सोमवारी सांयकाळी ५ वाजेपर्यंत या भागाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत.

सावर्डे भागातील नुकसानग्रस्त गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले आहे. आंबतखोलसह काही वाड्यांमधील वीजपुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत शंभर टक्के वीजपुरवठा सुरळीत होईल. - कैलास लवेकर, कार्यकारी अभियंता, महावितरण, चिपळूण
  
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 27-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow