लोकसभेत राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांचं हस्तांदोलन; पाहा Video

Jun 26, 2024 - 16:17
 0
लोकसभेत राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांचं हस्तांदोलन; पाहा  Video

नवी दिल्ली : अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सर्व खासदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर आज लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. राजस्थानमधील कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सकाळी 11 वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव सभापतीपदासाठी मांडला. या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अनुमोदन दिले. यानंतर एनडीएने आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर केला. इंडिया अलायन्सने काँग्रेसचे खासदार के सुरेश यांना सभापतीपदासाठी उमेदवारी दिली होती पण त्यांना विजयासाठी आवश्यक सदस्यांचा पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे ओम बिर्ला यांची सभापतीपदासाठी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले.

दरम्यान यावेळी सभागृहात लोकशाहीला साजेसं चित्र पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हस्तांदोलन केले. हे दुर्लभ चित्र पाहून सभागृहात देखील उत्साह वाढलेला दिसला. यानंतर दोन्ही नेत्यांनी मिळून नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांना त्यांच्या खुर्चीपर्यंत नेले आणि त्यांचे अभिनंदन केले. या क्षणाचा व्हिडिओ समोर आला आहे. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी हे दोघेही एकाच फ्रेममध्ये अशापद्धतीने दिसल्याची ही ऐतिहासिक घटना आहे. याआधी हे दोन्ही नेते कधीच असे एकत्र दिसले नव्हते. हा व्हिडिओ देशातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.

https://twitter.com/ANI/status/1805840902184910935?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1805840902184910935%7Ctwgr%5E92d56a1e5fb9872e47b397f57b5b23a4c7630fd8%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

सभागृहात नेमकं काय घडलं?

आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची सभापती म्हणून निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी त्यांच्या जागेवरून उठले आणि त्यांच्या जागेपासून काही अंतरावर बसलेल्या बिर्ला यांच्याकडे पोहोचले. त्यांना येताना पाहून बिर्लाही त्यांच्या जागेवरून उठले आणि त्यांनी पंतप्रधानांचे हात जोडून आभार मानले. पंतप्रधानांनीही त्यांना हस्तांदोलन करून अभिवादन केले. दरम्यान बिर्ला यांचे अभिनंदन करण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधीही पोहोचले. राहुल गांधी यांनी बिर्ला यांचे आभार मानले त्यानंतर त्यांनी आणि पंतप्रधान मोदी यानी देखील हस्तांदोलन केले. त्यानंतर मोदी आणि राहुल यांनी बिर्ला यांना स्पीकरच्या आसनापर्यंत पोहोचवले.

पंतप्रधान मोदींकडून सभापतींचे अभिनंदन

सभापतीपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. तुम्ही दुसऱ्यांदा सभापती झालात हे सभागृहाचे भाग्य आहे असे पंतप्रधान म्हणाले. तुमच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. तुमच्या चेहऱ्यावरील हास्य सदनाला आनंदी ठेवते. तुम्ही दुसऱ्यांदा निवडून आलात यासाठी खूप शुभेच्छा. तरुण खासदार तुमच्याकडून खूप काही शिकतील. तुमचे कार्य तरुणांना प्रेरणा देईल. तुमचे आणि सभागृहाचे अभिनंदन असे मोदी म्हणाले.

विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडूनही अभिनंदन

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिर्ला यांचे सभापतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. तुम्ही विरोधकांचा आवाज ऐकाल अशी आशा असल्याचे राहुल गांधी म्हणाले. सभागृह चालवण्यात विरोधी पक्ष तुम्हाला सहकार्य करेल कारण विरोधी पक्ष हा देशातील जनतेचा आवाज आहे, असे राहुल गांधी म्हणाले. यानंत समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव यांनीही ओम बिर्ला यांचे स्पीकर झाल्याबद्दल अभिनंदन केले. तुम्हाला पाच वर्षांचा अनुभव आहे. सदस्यांना तुमच्या अनुभवाचा फायदा होईल, असे अखिलेश म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:45 26-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow