लांजा : नासामधील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात संशोधनाला जायला आवडेल : सुमेद जाधव; ग्रामस्थांकडून कौतुक

Jun 26, 2024 - 11:03
Jun 26, 2024 - 16:09
 0
लांजा : नासामधील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात संशोधनाला जायला आवडेल : सुमेद जाधव; ग्रामस्थांकडून कौतुक

लांजा : नासामध्ये अंतराळवीर प्रशिक्षण केंद्र खूप आवडले. तेथील लोक खूप मेहनत करत होते. मला अभ्यास करून तेथे संशोधनासाठी जायला निश्चितच आवडेल. या साऱ्या प्रवासात मला खूप काही शिकता आले नवीन नवीन खाद्यपदार्थाची चव चाखायला मिळाली. माझ्या ज्ञानात खूप भर पडली आहे. याचा मला पुढच्या शिक्षणासाठी निश्चितच उपयोग होईल, असे नासाहून आलेल्या शिरवलीतील सुमेद सचिन जाधव याने सांगितले.

गजरात जंगी स्वागत केले. त्यावेळी तो बोलत होता. सुमेद म्हणाला, नासाला जाण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. मला खूप आनंद होत होता. अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रामधील एटीएक्स प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला. यामध्ये अंतराळस्थानकाची दुरुस्ती, ग्रहावरील खजिनांचा शोध, अंतराळातील प्रवास, अंतराळात प्रक्षेपण प्रणाली व नियंत्रण कक्षाची अनुभूती घेतली. अंतराळवीरांचा पोशाख, त्यांची वैशिष्टये तसेच विविध उपकरणे याबद्दलची माहिती येथील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिली, नासा सेंटर येथील रॉकेट गार्डनास भेट देऊन येथील विविध रॉकेट अटलांटिस स्पेस शटल यांची माहिती जाणून घेतली. हे सारे अविस्मरणीय क्षण आहेत. यावेळी सरपंच तेजिला राजापकर, शिरवली बौद्धजन विकास मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, सचिव सत्यविजय मांडकुलकर, शिरवली बौद्धजन विकास मंडळ (ग्रामीण) चे अध्यक्ष सुरेश जाधव, सचिव विठ्ठल जाधव, माजी सरपंच अन्वर रखांगी, पोलिसपाटील प्रकाश राजापकर, सखाराम जाधव, मुख्याध्यापक नंदकुमार गोतावडे, मार्गदर्शक शिक्षक उमेश केसरकर, श्रद्धा दळवी, संदीप घोरपडे, सुमेदचे आजी-आजोबा, आई-वडील, ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी झाले होते.

जेवणात गोडवा जास्त
अमेरिका प्रगत आहे. निसर्गसंपत्ती ही भरपूर आहे. दुपारचे कडकडीत ऊन असले तरी हवेत गारवा असतो. घामाघूम होत नाही. झोपडपट्टया नजरेत पडल्या नाहीत, चकाचक रस्ते, हायफाय गाड्या हे सारं नजरेत भरणारं होतं. खाण्यासाठी पिझ्झा, बर्गर होताच. जेवणात गोडवा जास्त होता, असे सुमेद जाधव यांनी सांगितले.

मोलमजुरी करणाऱ्या पाल्याला अमेरिकेची संधी
सुमेद जाधव शिरवलीत आल्यावर फटाक्यांची आतषवाजी करण्यात आली. महिलांनी औक्षण केले. गावकऱ्यांनी ढोल- ताशांच्या गजरात मिरवणूक काढून पेढे वाटले. खेडेगावातील मोलमजुरी करणाऱ्या पालकांच्या मुलाला अमेरिकेची संधी मिळाली याबद्दल सुमेदने जिल्हा परिषद रत्नागिरी व मार्गदर्शक शिक्षक, आई- वडिलांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:32 PM 26/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow