गुहागर : पालशेत-हेदवी पुलाचे काम पूर्ण; ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त

Jun 27, 2024 - 12:36
Jun 27, 2024 - 15:38
 0
गुहागर : पालशेत-हेदवी पुलाचे काम पूर्ण; ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त

गुहागर : तालुक्यातील पालशेत-हेदवी पूल पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस खुला झाल्याने येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत. ग्रामस्थांतर्फे चिपळूणकर यांचा सत्कार करण्यात आला.

पालशेत येथील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात या पुलावरची वाहतूक ठप्प होत होती. त्याचा फटका वाहनधारकांसह स्थानिक ग्रामस्थांना बसत होता. त्यामुळे नव्याने पूल उभारण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती. आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ५ कोटी रुपयांच्या निधीतून या पुलाच्या उभारणीचे काम सुरू झाले. पावसाळा तोंडावर असल्याने ठेकेदारांसमोर पूल उभारण्याचे आव्हान होते. पूल खाडीपात्रात असल्याने भरती ओहटीमुळे कामात अडचणी येत होत्या. मात्र, हा पूल वेळेत पूर्ण करण्यात यश आले. 

यानंतर उपसरपंच पंकज बिर्जे यांनी पुलाचे पूजन करुन पहिली गाडी सोडली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रामसे, उपअभियंता निकम, उपसरपंच पंकज बिर्जे, कंपनीचे इंजिनिअर सुनिल मेस्त्री, राजू गुहागरकर, विवेक तोडणकर, माधव सुर्वे, संदीप बजरेकर, नारायण पवार उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:04 PM 27/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow