रोहित सेनेनं रचला इतिहास, तब्बल 10 वर्षांनी टीम इंडिया बनली चॅम्पियन

Jun 29, 2024 - 23:18
 0
रोहित सेनेनं रचला इतिहास, तब्बल 10 वर्षांनी टीम इंडिया बनली चॅम्पियन

मुं बई : भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यात टी 20 वर्ल्ड कप 2024 चा फायनल सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. तब्बल 10 वर्षांनी टीम इंडियाला चॅम्पियनशिप पटकावण्यात यश आले आहे.

बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यात फायनल सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला तर द. आफ्रिकेला प्रथम गोलंदाजीचे आव्हान दिले होते. टीम इंडियाकडून फलंदाजी करताना रोहित शर्मा, रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादव हे फ्लॉप ठरले. विराटने 59 बॉलमध्ये 76 धावांची कामगिरी केली. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 षटकार ठोकले.

विराट कोहली वगळता अक्षर पटेलने 47, शिवम दुबेने 27 धावांची कामगिरी केली. द. आफ्रिकेच्या टीमला भारताच्या 7 विकेट्स घेण्यात यश आले. द. आफ्रिकेचा फलंदाज केशव महाराज आणि अॅनरिक नॉर्टजेने प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. तर मार्को जॅनसन आणि रबाडाने प्रत्येकी एक विकेट घेतली. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 177 धावांचे आव्हान दिले होते.

साऊथ आफ्रिकेकडून विजयाचे आव्हान पूर्ण करताना हेन्रीचं क्लासेन 52, डी कॉकने 39, ट्रिस्टन स्तबने 31, डेव्हिड मिलरने 21 धावा केल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow