दापोली : पंचनदी धरण शंभर टक्के भरले

Jul 1, 2024 - 16:04
 0
दापोली : पंचनदी धरण शंभर टक्के भरले

दापोली : येथील पंचनदी धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे ही बाब पंचनदी या गावासह परिसरातील गावांसाठी समाधानाची आहे.

दापोली तालुक्यातील पंचनदी येथे लघू पाटबंधारे विभागाने धरण बांधले आहे. या धरणातील पाण्याचा उपयोग हा पंचनदी येथील शेतकरी बागायतदारांच्या नारळ सुपारी बागायतींना तर होतोच शिवाय पंचनदी गावासह परिसरातील 6 गावांना सार्वजनिक नळपाणी पुरवठा करणा-या योजना या धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत.
 
पंचनदी येथे असलेल्या लघू पाट बंधारे विभागाच्या या धरणातील पाणीसाठयाची एकुण क्षमता 1.738 द.ल.घ.मी. इतकी आहे. धरण पाण्याने पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
 
या धरणातील पाणी साठयाचा उपयोग हा उजवा आणि डाव्या कालव्याव्दांरे पंचनदी येथील शेतकरी बागायतदारांच्या नारळ सुपारी बागायतींना होत आहे. त्याशिवाय पंचनदी, कोळथरे, दाभोळ, दुमदेव, बोरीवली येथील गावांच्या सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनांच्या विहीरी आहेत. तसेच जलाशयातील पाण्याच्या सिंचनाचा उपश्याव्दारे दुमदेव बोरीवली येथील बागायदारांना उपयोग होत आहे. त्यात नव्याने बुरोंडी या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या सार्वजनिक नळपाणी योजनेची विहीरही येथे खोदण्यात आली आहे या धरणातील पाण्याच्या साठयामुळे येथील अनेक खाजगी विहीरींची पाणी पातळी वाढण्यात मदत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:33 01-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow