सोनू निगमनी गुलाबजलने धुतले आशाताईंचे पाय

Jun 28, 2024 - 12:31
Jun 28, 2024 - 12:42
 0
सोनू निगमनी गुलाबजलने धुतले आशाताईंचे पाय

मुंबई : 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकात 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचे आणि दुर्मिळ छायाचित्र आहेत. आशा भोसले यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.

या कार्यक्रमात बोलताना सोनू निगम याने म्हटले की, आज सोशल मीडियावर अनेक गोष्टी गायनाबाबत शिकण्यासाठी आहेत. मात्र, त्यावेळी लताजी आणि आशाजी या होत्या. आशाताई आम्ही तुमच्याकडून जे काही शिकलो, त्यासाठी आभार व्यक्त करतो.
 
आम्ही अजूनही तुमच्याकडून शिकतोय. आपल्या हिंदू धर्मात, सनातन धर्मात गुरूंना देवाचे स्थान दिले जाते. आमच्यासाठी तुम्ही देवी आहेत. मी सनातन धर्माच्यावतीने तुमचा सन्मान करू इच्छितो असे सांगत सोनू निगमने भरमंचावर आशाताईंचे पाय धुत पाद्य पूजन केले. यावेळी मंचावर मंत्रोच्चार सुरू होता.
 
दरम्यान, या कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आदी उपस्थित होते.
 
यावेळी जगद्विख्यात पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्यावरील 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:09 28-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow