Share Market मध्ये तेजी, Sensex २३०० अंकांनी वधारला

Jun 5, 2024 - 17:00
 0
Share Market मध्ये तेजी, Sensex २३०० अंकांनी वधारला

शेअर बाजार बुधवारी चांगलाच तेजीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स तब्बल २३०० टक्क्यांहून अधिक घसरणीसह ७४३८२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७३६ अंकांच्या वाढीसह २२६२० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

शेअर बाजारातील बंपर तेजीमुळे निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ४ टक्के आणि निफ्टी बँक ४.५ टक्क्यांनी, तर निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस देखील ४ टक्क्यांहून अधिक मजबूतीवर बंद झाले.

निफ्टी फार्मा आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक तीन टक्क्यांनी वधारले, तर निफ्टी आयटी निर्देशांकही २.५ टक्क्यांनी वधारला. शेअर बाजारातील सर्वाधिक तेजींमध्ये अदानी पोर्ट्सच्या शेअर्सचा समावेश आहे, तर सर्वाधिक घसरलेल्या शेअर्सच्या यादीत भारत डायनॅमिक्सच्या समभागांचा समावेश आहे.

टॉप गेनर / लूझर कोण?

बुधवारी शेअर बाजार बंपर तेजीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी तीन टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. यामध्ये अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, टाटा स्टील, महिंद्रा, हीरो मोटोकॉर्प, हिंदाल्को आणि अदानी एंटरप्रायझेस या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे, तर घसरलेल्या कंपन्यांच्या समभागांमध्ये भारत डायनॅमिक्स, जीआरएसई, कोचीन शिपयार्ड, टिटागड वॅगन्स, डेटा पॅटर्न्स इंडिया, स्टर्लिंग विल्सन सोलर आणि पेटीएम यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचे सरकार स्थापन होताना दिसत असल्यानं सध्या आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये फारसे बदल करण्याची गरज नसल्याचं शेअर बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.

पीएसयू मल्टीबॅगर शेअर्सची स्थिती

कंटेनर कॉर्पोरेशन, माझगाव डॉक, कोल इंडिया, भेल, एनटीपीसी, गेल, भारत इलेक्ट्रॉनिक्स, आयआरएफसी, आयआरसीटीसी, इरकॉन इंटरनॅशनल, आरव्हीएनएल आणि एचएएलचे शेअर्स वधारले, तर बीईएमएल लिमिटेड, राइट्स लिमिटेड, टिटागड रेल, कोचीन शिपयार्ड आणि गार्डन रीच या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

अदानी समूहाचे दोन शेअर घसरले

गौतम अदानी समूहाच्या १० लिस्टेड कंपन्यांपैकी दोन कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले, तर आठ कंपन्यांचे शेअर्स वधारले. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर सुमारे ११ टक्क्यांनी वधारून बंद झाला. गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत नाल्को, पतंजली, देवयानी, सेल, फेडरल बँक, अशोक लेलँड, हिंदुस्थान झिंक, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुथूट फायनान्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. समभाग सर्वाधिक वधारले. तर बुधवारी एनएचपीसी लिमिटेडसारख्या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:16 05-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow