सोनाक्षी सिन्हाचं जहीर इकबालसोबत उद्या रजिस्टर मॅरेज

Jun 22, 2024 - 15:45
 0
सोनाक्षी सिन्हाचं जहीर इकबालसोबत उद्या रजिस्टर मॅरेज

भिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) उद्या बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत (Zaheer Iqbal) लग्नबंधनात अडकणार आहे. कुटुंबीय आणि मोजक्याच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि जहीर रजिस्टर मॅरेज करणार आहेत.

दरम्यान सोनाक्षीच्या मुंबईतील घरी इतर विधी पार पडत आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांचा मुंबईतील 'रामायणा' बंगला विद्युतरोषणाईने सजला आहे. तर सोनाक्षीला जहीरच्या नावाची मेहंदी लागली आहे.

सोनाक्षी सिन्हा काही वर्षांपासून जहीर इकबालला डेट करत होती. अचानक तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. उद्या २३ जून रोजी दोघं रजिस्टर मॅरेज करणार आहेत. सोनाक्षीचे कुटुंबीय या लग्नासाठी तयार नसल्याच्या चर्चा होत्या. 'आजकालची मुलं परवानगी घेत नाहीत..' असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं होतं. पण आता सिन्हा कुटुंबात सर्वकाही आलबेल झाल्याचं पाहायला मिळत आहे. 'रामायणा' बंगला आता विद्युत रोषणाईने सजला आहे. तर सोनाक्षीचा परिवारासह फोटो व्हायरल होतोय. काल रात्रीच त्यांचा मेहंदी सोहळा पार पडला. सगळीकडे फुलांची सजावट केली आहे. सोनाक्षी लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये सुंदर दिसत आहे. तर जहीरने पांढरा प्रिंटेड कुर्ता परिधान केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:55 22-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow