मंडणगडणात शेतीच्या कामांना मिळाली गती

Jul 2, 2024 - 16:57
 0
मंडणगडणात  शेतीच्या कामांना मिळाली गती

मंडणगड : गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या काळात विविध समस्यांना सामोरे जावे लागणाऱ्या तालुकावासीयांना यंदाचे जून महिन्यातील पावसाने गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात पडून सुखद धक्का दिला आहे. १ ते ३० जून या कालावधीत ७२७.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ५२१.८० मिमी पावसाची नोंद झाली होती. अजूनही पावसाचा तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने यंदा गेल्या वर्षीसारखी कमी पावसाची वेळ तालुक्यावर येणार नाही, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील शनिवार व रविवार या अखरेच्या दोन दिवसात पावसाने उसंत घेततल्याने खरीप हंगामाची कामे व वृक्षारोपणाला ठिकठिकाणी गती मिळाली आहे. शेतकरी भातलावणीच्या कामात व्यस्त झाला असून, नदीनाले मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाले आहेत.

 जून महिन्यातील पावसाने तालुक्यातील  विविध ठिकाणी घरे व गोठ्यांचे नुकसान होऊन साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दरडी कोसळल्याने अनेकदा विस्कळित झाली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:25 PM 02/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow