संगणक परिचालकांचं मानधन जुन्या करारानुसार

Jul 13, 2024 - 11:39
Jul 13, 2024 - 12:42
 0
संगणक परिचालकांचं  मानधन  जुन्या करारानुसार

साखरपा : राज्यातील सुमारे सहा हजार संगणक परिचालकांना मानधनवाढीचे आश्वासन अखेर कागदावरच राहिले आहे. नुकतेच अदा करण्यात आलेले एप्रिलचे मानधन जुन्या करारानुसारच करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेले संगणक परिचालक कर्मचारी दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. हा दर्जा मिळत नाही तोपर्यंत किमान मानधन वाढ व्हावी यासाठी आंदोलन करत आहेत. वर्षाच्या प्रारंभी फेब्रुवारी मार्च महिन्यात संगणक परिचालकांनी २५ दिवस मुंबई येथे धरणे आंदोलन केले होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकासमंत्री यांनी रुपये ३ हजारएवढी मानधनवाढ मंजूर केली.

ही मानधनवाढ जानेवारीपासून न करता नवीन आर्थिक वर्षापासून करण्याचेही आश्वासन देण्यात आले होते; पण प्रत्यक्षात मात्र ही मानधनवाढ आश्वासनापुरतीच मर्यादित राहिली आहे. दोन दिवसांपूर्वी परिचालकांचे एप्रिलचे मानधन त्यांच्या बँकखात्यात जमा करण्यात आले तेव्हा प्रत्यक्षात खात्यावर ७ हजारच जमा करण्यात आल्याचे परिचालकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मानधनवाढ हे पोकळ आश्वासन राहिल्याचे परिचालकांचे म्हणणे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 13/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow