माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'

Jul 16, 2024 - 11:11
 0
माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'

 नागपूर : माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत (Tree Planting Campaign Scam) कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार न झाल्याचे समोर आले आहे.

परिणामी 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात तात्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तात्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारने याबाबत आक्षेप घेत अनेक आरोप केले होते. त्यानुसार या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवालात सांगण्यात आले आहे. सोबतच राज्यात मोहिम यशस्वी झाल्याचेही समितीचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला असल्याचे समोर आले आहे.

समितीच्या अहवालात नेमके काय?

- या प्रकरणात सखोल चौकशी केली असता कुठलिही अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नसल्याचे आढळून आले आहे.

- राज्यात मोहिम यशस्वी झाल्याचे समितीचे स्पष्ट मत आहे.

- मोहिम राबवताना काही अडचणी आणि त्रुटी राहिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

- त्रुटी आणि अडचणी दूर करण्यासाठी सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

- लहान रोपट्यांऐवजी मोठी रोपटी लावण्याची यात शिफारस करण्यात आली आहे.

- या मोहिमेमुळे राज्यात 52 कोटी वृक्ष लागल्याची जमेची बाजु मांडण्यात आली आहे.

- खाणींच्या परिसरात झाडे लावण्याची शिफारसही समितीने या अहवालात केली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 16-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow