पुर्ये येथे 'मुख्यमंत्री वयोश्री योजने'चा १६५ जणांना मिळणार लाभ

Jul 16, 2024 - 11:17
Jul 16, 2024 - 14:17
 0
पुर्ये येथे 'मुख्यमंत्री वयोश्री योजने'चा १६५ जणांना मिळणार लाभ

साखरपा : नव्याने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ पुर्ये गावातील १६५ जणांना मिळणार आहे. गावाचे सरपंच बापू लोटणकर यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत.

मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्य शासनाने ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी जाहीर केली आहे. यामध्ये अशा ग्रामस्थांना वर्षाला ३००० रुपये मिळणार आहेत. आजपर्यंत १६५ ग्रामस्थांना या योजनेची माहिती दिली असून त्यापैकी ९० लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेत कागदपत्रे जमा करून घेतली आहेत. सध्या भात लावणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असल्याने दिवसभर सर्व शेतकरी शेतात जात आहेत. त्यामुळे बापू लोटणकर हे रात्री उशिरापर्यंत वाडीवाडीत फिरून ही योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचवत आहेत. या कामात त्यांना तेजस ठाकर, ओंकार ठाकर, ऋतिक गोरूले, दीपक माने, एकनाथ शिंदे, राजीव चव्हाण हे साथ देत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:45 16-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow