कोकण आयुक्त कार्यालयासमोर विस्थापित झालेल्या नागरिकांचे १९ जुलैला धरणे आंदोलन

Jul 16, 2024 - 10:47
Jul 16, 2024 - 15:59
 0
कोकण आयुक्त कार्यालयासमोर विस्थापित झालेल्या नागरिकांचे १९ जुलैला धरणे आंदोलन

खेड : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात विस्थापित झालेल्या खोके, दुकाने, घरे, टपन्या, हटिल्स, फळवाले नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. ही भरपाई मिळण्यासाठी १९ जुलैला सकाळी १० वाजल्यापासून कोकण भवन येथील कोकण आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत काँग्रेस, शेतकरी, कष्टकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक जाधव यांनी कोकण आयुक्तांना दिले आहे.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग, कार्यकारी अभियंता आदींना देण्यात आल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. गेल्या १८ वर्षांत या मार्गासाठी जमिनीचे भूसंपादन झाले. तेथील हजारो लोक विस्थापित झाले. त्यापैकी शेकडो लोकांची घरे गेली आहेत तसेच दुकाने, टपऱ्या, हॉटेल, चहावाले, फळवाले हे गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ व्यवसाय करत आहेत. त्यांच्याजवळ ग्रामपंचायती करपावत्या, वीजबिले आदी कागदपत्रे आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६चे अधिकारी यांना पाचवेळा निवेदने देऊनही त्यामध्ये वारंवार चुका काढल्या जात आहेत. 

याबाबत रत्नागिरी जिल्हा कार्यालय, भूसंपादन अधिकारी, नॅशनल हायवे यांच्याकडे किमान १३२ खेपा घालून आणि वेळोवेळी धरणे आंदोलने केले तसेच ३१ मार्च २०२२ ला भरउन्हात धरणे आंदोलने करूनही सातत्याने नुकसान भरपाईसाठी प्रकरणे पाठवली आहेत; मात्र त्यानंतरही भरपाई देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या विस्थापित झालेल्या नागरिकांसह १९ जुलैला सकाळी १० वाजल्यापासून शांततेत घरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:16 PM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow