संगमेश्वरात आशासेविका, गटप्रवर्तकांना रेनकोटचे वाटप

Jul 16, 2024 - 11:00
Jul 16, 2024 - 16:02
 0
संगमेश्वरात आशासेविका, गटप्रवर्तकांना रेनकोटचे वाटप

देवरुख : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या संगमेश्वर तालुका कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका संगमेश्वर आणि वाशिष्टी दूध डेअरी, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी तालुक्यातील आशासेविका आणि गटप्रवर्तक यांना पक्षाचे नेते प्रशांत यादव यांच्याहस्ते रेनकोटचे वाटप करण्यात आले.

आशासेविका या तळागाळातील लोकांना आरोग्य सेवा प्रामाणिकपणे देतात. या आशासेविकांचा सन्मान करणे हे आपले प्रथम कर्तव्य समजतो. आशासेविकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून मदत करण्यासाठी वाशिष्टी डेअरी सदैव निस्वार्थीपणे पाठीशी उभी असेल, अशी खात्री प्रशांत यादव यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष वेदा फडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष दत्ताराम लिंगायत, देवरुख शहराध्यक्ष निलेश भुवड, शिवसेना संपर्कप्रमुख खेडेकर यांसह महाविकास आघाडीचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच संगमेश्वर तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण खातू यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्ताराम लिंगायत यांनी मानले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:26 PM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow