दापोलीत बैलाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पाठलाग करून पकडले

Jul 18, 2024 - 10:02
Jul 18, 2024 - 10:39
 0
दापोलीत बैलाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पाठलाग करून पकडले

दापोली : तालुक्यातील दाभोळ पोलिसात मंगळवारी रात्री बेकायदेशीरपणे कत्तल करण्यासाठी बल नेत असलेल्या गाडीला पकडण्यात आल्याने दाभोळ परिसरात काल रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थाने वाहनाचा पाठलाग करून संशयितास पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत दाभोळ पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील वळणे बौद्धवाडी येथील संशयित सुरेश गणपत मोहिते याने त्याच्याकडील वीस हजार रुपये किमतीचा चार वर्षे वयाचा काळ्या रंगाचा बैल संशयित अब्दुल रीफ माखजनकर (रा. टेटवली, ता. दापोली) यास विकला. तो बैल अब्दुल रौफ माखजनकर याने त्याच्या ताब्यातील गाडीमध्ये (एमएच-०३-डीव्ही-९३२६) बैलास वेदना व हाल होतील, अशा रितीने पुरेशी जागा नसतानासुद्धा आखूड दोरीने बांधून त्या बैलास कत्तल करण्याच्या उद्देशानेच वाहनातून घेऊन जात होते. फिर्यादी नरेश नारायण मोहिते (वय ५०) यांनी सदर बैल घेऊन जात असलेले वाहन गावराई (ता. दापोली) येथे पाठलाग करून सायंकाळी ६.४५ वा. थांबवले. त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. दोघांविरुद्ध फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल गोरे करत आहेत.

*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
10:51 AM 18/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow