रत्नागिरी : राधाकृष्ण पतसंस्था आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

Jul 20, 2024 - 11:52
 0
रत्नागिरी : राधाकृष्ण पतसंस्था आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

रत्नागिरी : रत्नागिरीतील नामांकित पतसंस्था म्हणून ओळख असणाऱ्या राधाकृष्ण पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. रत्नागिरीतील एक विश्वासार्ह आणि जुनी पतसंस्था म्हणून राधाकृष्ण पतसंस्थेची ओळख आहे. मागील अनेकवर्ष सातत्याने लेखापरीक्षणाचा अ वर्ग या पतसंस्थेला मिळत आहे. आपली सामाजिक जबाबदारी ओळखून पतसंस्थेच्या संचालकांनी यावर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. 

याच अनुषंगाने दिनांक १९ जुलै २०२४ रोजी बसणी येथील एम् शेट्ये हायस्कूल येथील गरीब विद्यर्थ्याना राधाकृष्ण पतसंस्था आणि लायन्स क्लब रत्नागिरीच्या संयुक्त विद्यमाने गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी राधाकृष्ण संस्थेचे अध्यक्ष हेमंत वणजु, लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी, शाळेचे अध्यक्ष अॅड अविनाश शेट्ये व संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 20-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow