पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवावे : डॉ. सुश्रुत केतकर

Jul 22, 2024 - 15:16
Jul 22, 2024 - 15:22
 0
पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवावे : डॉ. सुश्रुत केतकर

रत्नागिरी : अभ्यासाबरोबरच खेळ, मस्ती करावी. मुलांनी आपल्या वयात मर्यादित व अत्यावश्यक असेल तेवढाच मोबाईलचा वापर करावा. कोवळ्या वयातील मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याची जबाबदारी पालक, शिक्षकांची आहे. सायंकाळच्या वेळी संस्कृत स्तोत्र पठण, ओंकार साधना करावी. यातून मेंदूचा विकास होतो हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. योग्य व्यायाम, आहार, निद्रा आवश्यक आहे. आपलं शिक्षण हे शिक्षक व समाजाच्या मदतीने सुरू असते. त्यामुळे आपण दोन्हींचे ऋण फेडू शकत नाही, असे प्रतिपादन फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी व डॉ. सुश्रुत केतकर यांनी केले.

फाटक हायस्कूल येथे आयोजित पाचवी. आठवी शिष्यवृत्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परूळेकर, कार्याध्यक्ष अॅड. सुमिता भावे, मुख्य कार्यकारी अधिकारी दाक्षायणी बोपर्डीकर, मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी मुख्याध्यापक राजन कीर यांनी प्रास्ताविकामध्ये शाळेच्या गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षकांचे कौतुक केले. दाक्षायणी बोपर्डीकर यांनी सांगितले, बारावीमध्ये गुणवत्ता यादी नसल्याने पाचवी, आठवीच्या परीक्षांमधून विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवावी. या प्रसंगी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.

यांचा झाला सत्कार
पाचवी शिष्यवृत्तीतील आर्या मोहिते, अर्णव पटवर्धन, ईरा गोखले आणि आठवी- पर्णिका परांजपे (राज्यात १६वी, जिल्ह्यात प्रथम), आदित्य बनगर (राज्यात १८वा जिल्ह्यात दुसरा) तसेच अभिराम तगारे, अद्वैत आगरे, काव्या भुके, सोहम मोरे, पूर्वा जोशी, श्रावणी जाधव, नवेली भिंगार्डे यांना सन्मानित करण्यात आले. एनएमएमएस शिष्यवृत्तीप्राप्त निकिता बडोले, प्रथम शिंदे, सारथी शिष्यवृत्ती अर्णव साळवी, पार्थ सावंत तसेच जिल्हा परिषदेमार्फत नासा सफर करणारी शमिका शेवडे हिचा सत्कार केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow