अर्थसंकल्पाविरोधात खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषणा

Jul 25, 2024 - 10:14
 0
अर्थसंकल्पाविरोधात खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषणा

खेड : खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावतीने भरणे नाका येथे बुधवारी केंद्र सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याला केंद्रसरकारने केराची टोपली दाखवली, यामुळे शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये संताच्या महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारने अन्याय केला आहे. यामुळे भरणा नाका येथे निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोष, महाराष्ट्र रोष. अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष विनायक निकम युवक अध्यक्ष सुरज जोगळे जिल्हा सरचिटणीस गिता घाणेकर, चंद्रशेखर हेळगावकर, राजेश्री चव्हाण, मनोहर जाधव, सुभाष पालकर, महेश घाणेकर, प्रशांत शितप, लक्ष्मण घोलप, सौ. दीपाली कडू, प्रियंका चव्हाण, भारती पार्टे असे सर्व कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 25-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow