Ratnagiri : गणपतीपुळेत समुद्राच्या लाटा 'श्रीं' च्या भेटीला

Jul 26, 2024 - 12:50
Jul 27, 2024 - 09:36
 0
Ratnagiri : गणपतीपुळेत समुद्राच्या लाटा 'श्रीं' च्या भेटीला

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्राला गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. समुद्राच्या लाटा थेट गणपती मंदिराच्या पायथ्याशी जाऊन धडकत आहेत. एखाद-दुसरी लाट थेट गणपती मंदिराच्या पश्चिमद्वार असलेल्या मुख्य गेटपासून प्रांगणात प्रवेश करत असल्याने समुद्राच्या लाटा थेट बाप्पाच्या भेटीला आल्या, अशा प्रकारच्या भावना स्थानिक ग्रामस्थ आणि भाविक-पर्यटकांमधून व्यक्त होत आहेत. गणपतीपुळे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे येथील समुद्र मोठ्या प्रमाणात खवळल्याने समुद्राला उधाण आले आहे. 

तसेच मोठमोठ्या लाटा  समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकत आहेत. काही लाटा थेट गणपती मंदिराच्या पायथ्याशी व मुख्य गेटपासून आत मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करीत असल्याचे चित्र दिसून येते.

हे दृश्य पाहण्यासाठी भाविक व पर्यटकांबरोबरच स्थानिक ग्रामस्थांची गर्दी होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून येभील समुद्राला मोठ्या प्रमाणात येत असलेल्या उधाणामुळे पर्यटक व भाविकांनी समुद्रकिनाऱ्यावर उतरू नये, तसेच खोल समुद्राच्या पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये याकरिता गणपतीपुळे ग्रामपंचायत व देवस्थान समिती तसेच पोलिस यंत्रणा विशेष लक्ष ठेवून आहेत.

या ठिकाणी येणाऱ्या भाविक व पर्यटकांनी समुद्राचे उधाण लक्षात घेऊन समुद्राच्या पाण्यात न जाण्याचे आवाहन गणपतीपुळे ग्रामपंचायत व गणपतीपुळे पोलिस यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 26/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow