रत्नागिरी : 'इन्फिगो आयकेअर'मध्ये मोतीबिंदू सूक्ष्म शस्त्रक्रिया विशेषज्ज्ञ डॉ. वरुण गुप्ता उद्या तपासणी करणार

Jul 26, 2024 - 12:04
Jul 26, 2024 - 15:10
 0
रत्नागिरी : 'इन्फिगो आयकेअर'मध्ये मोतीबिंदू सूक्ष्म शस्त्रक्रिया विशेषज्ज्ञ डॉ. वरुण गुप्ता उद्या तपासणी करणार

रत्नागिरी : येथील इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये येत्या शनिवारी (ता. २७) कॉर्निया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. वरुण गुप्ता रुग्णांची तपासणी करणार आहेत. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला जाड भिंगाचा चष्मा असेल अथवा मोतीबिंदू पिकलेला किंवा सुरुवात झाली आहे, अशा रुग्णांची तपासणी ते करणार आहेत. निदान झाल्यानंतर या रुग्णांची आधुनिक सूक्ष्म पद्धतीने शस्त्रक्रिया पुढील महिन्यात ते करणार आहेत. याकरिता शनिवारी अशा रुग्णांनी तपासणी करावी, असे आवाहन इन्फिगो आयकेअरने केले आहे.

चित्रकूट येथील राष्ट्रीय नेत्रविज्ञान संस्थेतून प्रशिक्षित डॉ. गुप्ता हे कॉर्निया व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहेत. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीचा चष्म्याचा नंबर वजा ३च्या पुढे असल्यास म्हणजे जाड भिंगाचा, सोडावॉटरच्या काचांप्रमाणे ज्यांचा चष्मा आहे अशा रुग्णांची विशेष तपासणी डॉ. गुप्ता करणार आहेत. अशा रुग्णांनी साळवी स्टॉप येथील इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत तपासणीकरिता यावे.

डोळ्यात फूल पडणे, डोळ्याला मार बसलेला असणे अशा गोष्टींमुळे ज्या रुग्णांची दृष्टी अधू झाली आहे, ज्यांना मोतीबिंदू नाही; परंतु चष्मा आहे व तो काढून टाकायचा आहे, अशा शस्त्रक्रिया डॉ. गुप्ता सूक्ष्म पद्धतीने करतात. ज्यांच मोतीबिंदू पिकले आहेत किंवा सुरुवात झाली आहे, अशा रुग्णांची ३ मिलिमीटर इतक्या कमी छेदातून आधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात डॉ. गुप्ता माहीर आहेत. अशा रुग्णांची ते तपासणी करणार असून, पुढील महिन्यात शस्त्रक्रिया करण्यासाठी ते स्वतः येणार आहेत. या रुग्णांनीही तपासणीकरिता यावे, असे आवाहन इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलच व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 26/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow