रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पत संस्थेला राज्य पत संस्था फेडरेशन चा दीपस्तंभ पुरस्कार घोषित

Jul 27, 2024 - 09:56
Jul 27, 2024 - 09:57
 0
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पत संस्थेला राज्य पत संस्था फेडरेशन चा दीपस्तंभ पुरस्कार घोषित

रत्नागिरी : राज्य पत संस्था प्रतिवर्षी संस्थानचे आर्थिक व्यवहारांची  माहिती घेत त्या आधारावर उत्तम काम करणाऱ्या पत संस्थाना सन्मानित करते. राज्य पतसंस्था फेडरेशन ने पुरस्कार द्यायला सुरवात केल्या पासुन आतापर्यंत घोषित झालेले सर्व दीपस्तंभ पुरस्कार विविध वर्गात स्वरूपानंद ने प्राप्त केले आहेत.

शुक्रवारी राज्यपत संस्था फेडरेशन चे अध्यक्ष. पत संस्था चळवळीचे नेतृत्व काकासाहेब कोयटे यांनी तज्ञ समितीने निवड केलेल्या पुरस्कार प्राप्त संस्थांची नावे जाहीर केली. त्यात १०० कोटी पुढील ठेव प्रकारात मुंबई, नवी मुंबई, ठाणे , पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या कोकण विभागातून स्वामी स्वरूपानंद पत संस्थेला दीपस्थंभ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
   
स्वरूपानंद पत संस्था सातत्याने उत्तम आर्थिक व्यवहार करत आली आहे. विक्रमी वसुली हा संस्थेच्या यशाचा आत्मा राहिला आहे.  भांडवल पर्याप्तता २८%इतकी प्रभावी  राहिली आहे. ४३ कोटींचा स्वनिधी हा संस्थेची उत्तम आर्थिक स्थिती चा द्योतक मानला जातो. ४५ हजार च्या घरात पोचलेली सभासद संख्या संस्थेला सर्वसमावेशक संस्थेचा दर्जा देते. ३२२कोटींच्या  ठेवी २२० कोटींची कर्ज १४२ कोटींच्या गुंतवणुका अशा भक्कम स्थितीत  स्वरुपानंद पत संस्था सातत्याने राहिली आहे. संस्थेने स्पर्धात्मक युगात उपक्रमशीलता जोपासात प्राप्त प्रत्येक संधीचा लाभ उठवण्यात संस्थेने कोणतीही कसर सोडली नाही. नवतंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग करत  ग्राहकाना सर्वोत्तम सेवा देऊ करण्याचा परिपाठ जपला आहे. या पर्श्वभूमीवर प्राप्त झालेला हा पुरस्कार उर्जादायी  ठरणार आहे, अशी परतिक्रिया अँड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 27-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow