बेदरकारपणे क्रेन चालवून एमआयडीसी मिरजोळे येथे उभ्या दुचाकीला धडक

Jul 29, 2024 - 12:12
Jul 29, 2024 - 12:12
 0
बेदरकारपणे क्रेन चालवून एमआयडीसी मिरजोळे येथे उभ्या दुचाकीला धडक

रत्नागिरी : बेदरकारपणे क्रेन चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक देत अपघात केला. या प्रकरणी क्रेन चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही घटना शुक्रवार २६ रोजी सायंकाळी ७.५० वा. एमआयडीसी मिरजोळे येथील प्लॉट नं ई-५/६ समोर घडली. निलेश कुमार शिवनाथ (रा. एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या क्रेन चालकाचे नाव आहे. 

त्याच्या विरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनसार, शुक्रवारी सायंकाळी ते आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-एवाय- ४६९८) मिरजोळे एमआयडीसी येथील जिमकॉम कंपनीकडे तोंड करुन रस्त्याच्या बाजूला उभा होता. त्यावेळी समोरुन येणारी क्रेन (एमएच-१४- एझेड-८२८६) वरील चालकाने हयगयीने क्रेन चालवून समोरुन फिर्यादीच्या दचाकीला धडक देत हा अपघात केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 29-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow